शिवप्रहार न्यूज - सागर व संदीप विरोधात श्रीरामपुरात पोक्सो दाखल...
सागर व संदीप विरोधात श्रीरामपुरात पोक्सो दाखल...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर एक भागामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दोन आरोपींनी दारू पिऊन विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी सागर कांबळे व संदीप कांबळे यांनी सतरा वर्षीय पीडित मुलगी ही किराणा दुकानात जात असताना तिला जोरात ओढुन, त्यांनी तिच्या शरीराला स्पर्श केला.तसेच आरोपींनी पीडितेच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिली.
या प्रकरणावरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन कडून चालू आहे.