शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात कर्नाटक पोलिसांनी २ इराणी गुन्हेगारांसह सोने घेणाऱ्याला घेतले ताब्यात…
श्रीरामपुरात कर्नाटक पोलिसांनी २ इराणी गुन्हेगारांसह सोने घेणाऱ्याला घेतले ताब्यात…
श्रीरामपूर- कर्नाटक पोलीसांनी चोरीच्या सोने प्रकरणी येथील दोन इराणी गुन्हेगारांसह श्रीरामपूर शहरातील सोने घेणाऱ्याला व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. कर्नाटक मधील कोईमतूर येथे श्रीरामपूरातील इराणी गुन्हेगारांनी सोने चोरी केली होती. तसा गुन्हा तेथील पोलिस स्टेशन मध्ये दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी कर्नाटक पोलीस श्रीरामपूरात आले होते. त्यांनी दोन इराणी गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांतर चोरीचे सोने ज्याला विकले त्यालाही पकडले. त्यांना घेऊन पोलीस कर्नाटकला गेले. त्यांनी किती तोळे सोने विकले आहे, हे मात्र समजू शकले नाही. शहर पोलीस ठाण्यात तशी या घटनेची नोंद करुन कोईमतूर पोलीस तीन आरोपींना घेऊन गेले.
शहरातील इराणी बाहेरच्या राज्यात जाऊन गुन्हे करतात त्यामुळे राज्या बाहेरील पोलीस येथे येवून त्यांना घेऊन जातात. यापुर्वी अशा अनेक घटनांमध्ये पोलिस येथील गुन्हेगारांना घेऊन गेलेले आहे. या सराईत गुन्हेगारांची मोठी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या गुन्हेगारांकडून चोरीचे सोने घेणारा कोण? हे लवकरच जनतेसमोर येणार आहे.