शिवप्रहार न्युज - कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्यात कोयत्याने वार!

कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या डोक्यात कोयत्याने वार!
पारनेर ( शिवप्रहार न्युज) अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे न्यु आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज,पारनेर येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी शुभम याच्या डोक्यात धारधार कोयत्याने वार करण्यात आला या हल्ल्यामुळे शुभम खाली कोसळला तरीही आरोपी साहीलने पुन्हा त्याच्यावर कोयत्याने वार केला.तेव्हा शुभमने हात मध्ये घातला असता तो गंभीर जखमी झाला आहे.तरी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दि.२५ जानेवारी रोजी कॉलेज परिसरात हा खुनाचा प्रयत्न झाला.जखमी शुभमच्या फिर्यादीवरून आरोपी विद्यार्थी साहील याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहीता १०९ ,११५ ' (२ ),३ ५ १ (२ ),३५ १ (३ ) प्रमाणे पारनेर पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि . बारवकर यांनी घटनास्थळी भेट दिली तर फरार आरोपीचा सपोनि मुजावर हे शोध घेत आहे.किरकोळ भांडणातून विद्यार्थ्यांचे वाद वाढून थेट कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रकार घडल्याने पालक - विद्यार्थी व पारनेरमध्ये खळबळ उडाली आहे.