शिवप्रहार न्यूज- बेलापूर जवळील गावात माजी कारखाना संचालकाच्या घरावर दरोडा;१७ तोळे सोने चोरले…

बेलापूर जवळील गावात माजी कारखाना संचालकाच्या घरावर दरोडा;१७ तोळे सोने चोरले…
बेलापूर - राहुरी तालुक्यात असणाऱ्या परंतु बेलापूर गावापासून जवळ असणाऱ्या ब्राम्हणगाव भांड या गावामध्ये राहणारे राहुरी कारखान्याचे माजी संचालक तथा मा.प्राचार्य रमेश वारुळे व त्यांचे बंधू सुभाष वारुळे यांच्या घरावर आज पहाटे मोठा दरोडा पडला.
या दरोडा मध्ये चोरट्यांनी तब्बल 17 तोळे सोनं व इतर मुद्देमाल चोरून नेले.तसेच घरातील कपाट व इतर वस्तूंची उचकापाचक करून कपाट रानात नेऊन फेकले अशी माहिती समजत आहे.