शिवप्रहार न्युज - विद्यार्थीनीचा विनयभंग! फोटोग्राफरने मागितले १५ लाख!! 

शिवप्रहार न्युज -  विद्यार्थीनीचा विनयभंग! फोटोग्राफरने मागितले १५ लाख!! 

विद्यार्थीनीचा विनयभंग! फोटोग्राफरने मागितले १५ लाख!! 

नेवासा / सोनई (शिवप्रहार न्यूज) एका 22 वर्षाच्या तरुण विद्यार्थीनीने सोनई गावातील फोटोग्राफर याचेकडे ०१ वर्षापूर्वी फोटो काढले होते . या फोटोग्राफरची नियत फिरली आणि तो तरुणीशी जवळीक साधू लागला.तेव्हा तरुणीच्या नातेवाईकांनी फोटोग्राफर रणजित बाळासाहेब सोणवणे याला समज दिली. यानंतर रणजित तरुणीचे काढलेले फोटो नातेवाइकांचे इस्टाग्राम व स्नॅपचॅटवर टाकुन व विद्यार्थीनीच्या मावस भावाकडे इस्टाग्रामवर कॉल करून १५ लाखाची खंडणी मागीतली ! तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी पिडीत तरुणीने सोनई पोलीसात फिर्याद दिल्यावरून सोनईतील प्रशांतनगर भागात राहणारा आरोपी रणजित बाळासाहेब सोणवणे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७८ (१ )(i) ७८(१)(॥) ३०८(३ ) प्रमाणे विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

        सपोनि गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ लबडे हे पुढील तपास करीत आहेत .एका फोटोग्राफरने तरुणीचा विनयभंग करत फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार घडल्याने नागरीक महिला व तरुणींमध्ये एकच खळबळ उडाली आहे .