शिवप्रहार न्युज - लई माजला म्हणत श्रीरामपुरात फायटरने तरूणाची दाढ पाडली...
लई माजला म्हणत श्रीरामपुरात फायटरने तरूणाची दाढ पाडली...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- खुन्नसच्या देण्याच्या कारणातून एकाला अडवून फायटरने मारहाण करून त्याची दाढ पाडण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.
याबाबत, सुंदर मालाराम उईके, वय-२२, धंदा-गाडी डेकोरेशन, रा. गौडगल्ली, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या शेजारी राहणारे काहीजण आपल्याला नेहमी खुन्नस देतात. आपण सकाळी ९.३० च्या सुमारास घोडेगाव, ता. नेवासा येथे जाण्यासाठी उभे असताना रॉयल इन्फिल्ड शोरूमसमोर कैलास जामकर त्याच्यासोबत प्रतीम सडमाके, अवि जामकर हे पल्सर मोटारसायलवर आले व त्यांनी तू लई माजला, असे म्हणत शिवीगाळ करू लागले. तेव्हा आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याचा राग येवून त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
घाबरून आपण घराकडे पळून जात असताना प्रतीम सडमाके याने आपल्याला पकडून जामकर याने त्याच्याकडील फायटरने तोंडावर मारहाण करून जखमी केले. त्यात आपली डावी दाढ पडली. आपण आरडाओरडा केल्याने आरोपींनी परत नादी लागला तर जिवंत सोडणार नाही, असे म्हणत त्या ठिकाणाहून ते निघून गेले. साखर कामगार रूग्णालय येथे आपल्यावर उपचार केल्याचे फिर्यादीत म्हटले असून याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.