शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कॅश पळवली.
श्रीरामपुरात पेट्रोल पंप कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कॅश पळवली...
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहर परिसरातील अशोक नगर फाटा जवळील अशोक दूध डेरी व रिलायन्स पेट्रोल पंप या परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
फिर्यादी दिपक रामकिसन देवरे वय 39 ,राहणार-इंदिरानगर,श्रीरामपूर यांनी तक्रारीत सांगितले की,ते पेट्रोल पंपावरील रकमेचा भरणा करण्यासाठी जात असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड चोळून त्यांना दुखापत केली आणि दीपक देवरे यांच्या हातातील रोख रक्कम 55 हजार 300 रुपये असलेली पिशवी बळजबरीने चोरून नेली.
त्यानंतर हा चोरटा त्या ठिकाणावरून तात्काळ फरार झाला. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिराने जबरी चोरीचा गुन्हा 455/2021 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याच्या घटनास्थळी पोलिस निरीक्षक श्री.सानप यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.घायवट हे करीत आहेत.