शिवप्रहार न्युज - होणारा नवरा गाडी आणायला गेला असता श्रीरामपूरच्या तरूणीला शिर्डीतून पळविले…

शिवप्रहार न्युज - होणारा नवरा गाडी आणायला गेला असता श्रीरामपूरच्या तरूणीला शिर्डीतून पळविले…

होणारा नवरा गाडी आणायला गेला असता श्रीरामपूरच्या तरूणीला शिर्डीतून पळविले…

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपुरातील संजयनगर परिसरात राहणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला शिर्डी येथून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सदर अल्पवयीन तरूणीची आई मोलमजूरी करते. ती संजयनगर, श्रीरामपूर येथे राहणारी आहे. 

     सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण पतीसह मोलमजूरी करून श्रीरामपुरात राहातो. आपल्या मुलीचे नात्यातीलच अमोल नावाच्या मुलाशी लग्न जमले होते. तिचे वय पूर्ण झाल्यावर आम्ही त्यांचे लग्न लावून देणार होतो. दरम्यान, काल 11 नोव्हेंबर रोजी माझी मुलगी आणि तिचा होणारा पती अमोल हे श्रीरामपूर येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. तेव्हा रात्री अमोलचा आम्हाला फोन आला, त्याने सांगितले की, आम्ही शिर्डी येथे आल्यावर मंदिराच्या गेट नं.4 समोरील पार्कींगमध्ये दुचाकी लावली होती. त्यानंतर आम्ही दर्शन घेतले. साईबाबा मंदिर परिसरात फिरलो त्यानंतर घरी जायचे म्हणून मी 7.30 वा. आपल्या होणार्‍या पत्नीस गेट नं.4 समोर थांबायला सांगून मोटारसायकल आणायला गेलो. 

     पण जेव्हा मोटारसायकल घेवून आलो तेव्हा आपली होणारी पत्नी त्याठिकाणी नव्हती. त्यानंतर तिचा शिर्डी परिसरात सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यानंतर श्रीरामपूर येथील या मुलीचे आईवडीलही शिर्डीत तिला शोधण्यासाठी गेले परंतु, ती सापडली नाही. सदर तरूणी ही 17 वर्षे 11 महिले एवढ्या वयाची असून ती 12वी शिकत आहे. तिच्या अंगात पिवळया रंगाचा टॉप आणि चॉकलेटी रंगाचे जर्किन आहे. सदर मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, आपल्या मुलीला कोणीतरी अमीष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे.     

       याप्रकरणी शिर्डी पोलिसात भादंवि कलम 363 नुसार अज्ञात अनोळखी इसमाविरोधात गुरनं.545/2022 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.