शिवप्रहार न्यूज- किराणा दुकानात वाईन विक्रीला तहलिलदारांना निवेदन देवून राष्ट्रीय वारकरी परिषदेचा विरोध…
किराणा दुकानात वाईन विक्रीला तहलिलदारांना निवेदन देवून राष्ट्रीय वारकरी परिषदेचा विरोध…
राहता- महाराष्ट्र राज्य सरकारने मॅाल व किराणा दुकानांमध्ये दारू व वाईन विक्री संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्यावा या साठीचे निवेदन राष्ट्रीय वारकरी परीषद, महाराष्ट्र राज्य अंतर्गत अ.नगर जिल्हा अंतर्गत राहाता तालुका कोअर कमिटीच्या वतीने राहाता तालुका तहसील कार्यालयात तहसीलदार श्री कुंदन हिरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ह भ प वेणुनाथ महाराज विखे ,राष्ट्रीय प्रचारक राष्ट्रीय वारकरी परीषद महाराष्ट्र राज्य ह भ प केशव म.तरस ,अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परीषद अ.नगर जिल्हा उत्तर विभाग ,हभ प ज्ञानदेव म.पानसरे संघटक राष्ट्रीय वारकरी परीषद अ.नगर जिल्हा उत्तर विभाग ,हभ प बबनराव म.दाहेदार अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परीषद राहाता तालुका, ह भ प बाबासाहेब म.रोकडे अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परीषद राहाता तालुका अंतर्गत दुर्गापुर शाखा व इतर उपस्थित होते.