शिवप्रहार न्यूज- बस चालकाला फिट आल्यानंतर बस चालवणाऱ्या मूळ श्रीरामपूरच्या महिलेचा अनेक मंत्री,नेते मंडळींकडून सत्कार-कौतुक…
बस चालकाला फिट आल्यानंतर बस चालवणाऱ्या मूळ श्रीरामपूरच्या महिलेचा अनेक मंत्री,नेते मंडळींकडून सत्कार-कौतुक…
श्रीरामपूर - पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे राहणार्या योगिता धर्मेंद्र सातव यांनी गेल्या महिन्यात मोराची चिंचोली येथून परतत असताना बस चालकाला फिट आल्यानंतर प्रसंगावधान दाखवून बस स्टेरिंग हाती घेऊन चालकाला वैद्यकीय उपचारासाठी नेले.त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे अनेकांचा जीव वाचला.
या त्यांच्या कृतीमुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ,शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू ,खासदार कोल्हे यांच्यासह अनेक नेते मंडळींनी त्यांचे पत्र पाठवून कौतुक केले.तसेच श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पुण्यात योगिता सातव यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला.
योगिता सातव या श्रीरामपूरचे नानासाहेब रसाळ यांच्या कन्या तर नंदकुमार रसाळ यांच्या पुतणी आहेत. श्रीरामपूर त्यांचे माहेर असल्यामुळे त्यांचा श्रीरामपूर येथे देखील सत्कार करणार असल्याची माहिती समजते.