शिवप्रहार न्यूज - एकलहरे परिसरात बिबट्या ने केली पाळीव कुत्र्याची शिकार...

शिवप्रहार न्यूज - एकलहरे परिसरात बिबट्या ने केली पाळीव कुत्र्याची शिकार...

एकलहरे परिसरात बिबट्या ने केली पाळीव कुत्र्याची शिकार...

श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे गावामध्ये बिबट्याने एका पाळीव कुत्र्याची रात्री शिकार केल्याची घटना घडली आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील जाहीगीरदार यांच्या मालकीच्या शेतात काहींना बिबट्या आल्याचे दिसले.त्यानंतर काही काळाने त्याने तेथील पाळीव कुत्र्याला ठार केले.बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केल्यामुळे या भागात भितीचे वातावरण पसरले आहे.

       गेल्या दोन महिन्यापासून एकलहरे गावातील नागरिक वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करत आहे. परंतु वन विभागाने याबाबत उदासीनता दाखवल्याचे दिसून येते.कुत्र्याची शिकार करणारा बिबट्या माणसांवर,शेतात काम करणार्‍या शेतकऱ्यांवर हल्ला करू शकतो अशी भीती नागरिकांना सतावत आहे.