शिवप्रहार न्यूज - कुत्रा चावल्याने रेबीजचे इंजेक्शन घ्यायला गेलेल्या तरुणाला श्रीरामपूर नगरपालिका दवाखान्याने दिला विना स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट
कुत्रा चावल्याने रेबीजचे इंजेक्शन घ्यायला गेलेल्या तरुणाला श्रीरामपूर नगरपालिका दवाखान्याने दिला विना स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट...
श्रीरामपूर - तालुक्यातील कारेगाव येथील एक 22 वर्षीय युवकाला कुत्रे चावल्यामुळे तो रेबीज च्या दुसऱ्या डोस चे इंजेक्शन घेण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेच्या दवाखान्यात गेला होता. रेबीजचे इंजेक्शन घेत असताना तेथे असलेल्या rt-pcr केंद्रात सदर तरुणाने rt-pcr चाचणीबाबत सहज विचारपूस केली.
त्यावेळी तेथे असलेल्या महिला कर्मचाऱ्याने त्याचे नाव व इतर माहिती तात्काळ रजिस्टरमध्ये नोंद करून घेतली. आज सोमवारी नगरपालिकेतुन या तरुणाला कोरोना पॉझिटिव असल्याबाबतचा rt-pcr रिपोर्ट मोबाईलवर प्राप्त झाला. स्वॅब न घेता नगरपालिका रुग्णालयाने कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याने या तरुणाला मोठा धक्का बसला आहे.
तसेच कोरोना पॅासिटिव्ह रिपोर्ट मुळे कारेगाव ग्रामपंचायतीकडून व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सारखी विचारणा होत असल्याने या तरुणाला प्रचंड मनस्ताप होत आहे.
कुत्रा चावला म्हणुन रेबीजचे इंजेक्शन घ्यायला गेलेल्या तरुणाला स्वॅब न घेता कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्यामुळे श्रीरामपूर नगरपालिका दवाखान्याच्या विश्वासार्हतेला जबर फटका बसल्याचे दिसत आहे.