शिवप्रहार न्यूज- संगमनेरात 1 हजार किलो गोमांस पकडले; झायलो,टेम्पो जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

शिवप्रहार न्यूज- संगमनेरात 1 हजार किलो गोमांस पकडले; झायलो,टेम्पो जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संगमनेरात 1 हजार किलो गोमांस पकडले; झायलो,टेम्पो जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संगमनेर (शिवप्रहार न्युज)- 

राज्यात गोवंश जनावरे हत्या बंदी असतांना देखील संगमनेरात मात्र सर्रास जनावरांची कत्तल होत आहे. शहरातील बेकायदा कत्तलखान्यावर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे एक हजार किलो गोवंश मांस व तीन वाहने असा 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असतांनाही बुंदी उर्फ मुद्दसर करीम कुरेशी याने गोवंश जातीचे जिवंत जनावरे डांबून ठेवून त्यांना अमानुषपणे वागवून देवून विना चारा व पाण्याचे ताब्यात ठेवून त्यांची कत्तल करुन गोमांस महिंद्रा झायलो नं. एम एच 44 एच 0834 व छोटा हत्ती नं. एम एच 43 ए डी 2262 अशा वाहनातून रेहमत नगर, गल्ली नं. 4, जोर्वे रोड, संगमनेर येथून वाहतुक करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने जोर्वे नाका येथे सापळा लावला.

रात्री 1 वाजेच्या सुमारास जोर्वे रोडने एक झायलो गाडी येतांना पोलिसांना दिली. त्यापाठीमागे छोटा हत्ती येतांना दिसला. सदर झायलो गाडी पोलिसांनी थांबविली. मात्र छोटा हत्ती चालकाला पोलिसांची चाहूल लागल्याने तो गाडी सोडून पळून गेला. झायलो चालक सलमान नजीर शेख (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच पळून गेलेला बुंदी ऊर्फ मुद्दसर करीम कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) असल्याचे सलमान शेख याने सांगितले.

पोलिसांनी 3 लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती नं. एम एच 43 ए डी 2262 हे वाहन व त्यामधील 1 लाख 20 हजाराचे 600 किलो गोमांस, 3 लाख 50 हजार रुपये किमतीची झायलो कार नं. एम. एच. 4 एच. 0834 व तिच्यात भरलेले 80 हजार रुपयांचे 400 किलो गोमांस असा एकूण 8 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत पोलीस नाईक सचिन दत्तात्रय आडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात सलमान नजीर शेख व मुद्दसर करीम कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1029/2022 भारतीय दंड संहिता कलम 269, 34, महाराष्ट्र पशुसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे कलम 5 (क), 9 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक उगले करत आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक शंकर चौधरी, संतोष लोढे, राहुल सोळंके, संदिप चव्हाण, बबन बेरड, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या तपास पथकातील पोलीस नाईक आण्णासाहेब किसन दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिवाजी बोडखे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद अशोक गाडेकर, अमृत शिवाजी आढाव यांनी सहभाग घेतला.