शिवप्रहार न्युज - पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जदारांना माहिती देण्याची असमर्थता-जिल्हाध्यक्ष शितल गोरे…

शिवप्रहार न्युज -  पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जदारांना माहिती देण्याची असमर्थता-जिल्हाध्यक्ष शितल गोरे…

पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून कर्जदारांना माहिती देण्याची असमर्थता-जिल्हाध्यक्ष शितल गोरे…

श्रीरामपूर[प्रतिनिधी] याबाबत अधिक माहिती अशी की,जिल्हाध्यक्ष शितल गोरे,निर्भय महाराष्ट्र राज्य संघटना दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे की,श्रीरामपूरमध्ये अनेक पतसंस्था असून त्यांचा कारभार थोडाफार व्यवस्थित आहे.कर्जदारांनी माहिती मागविली तर सौजन्याने लगेच त्याचवेळी पारदर्शकता असल्याने आवश्यक माहिती दिली जाते.परंतु त्याला अंबिका महिला पतसंस्थेचा अपवाद आहे.लेखा परीक्षणातून नियमबाह्य कर्जवितरण,कर्जदारावर नियमबाह्य कर्ज लादणे,वसुली करणे यासाठी आमच्याकडुन श्रीरामपूर महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते.सहायक निबंधक यांचेकडून अद्याप कारवाई केली जात नाही.त्याचप्रमाणे दिनांक १ एप्रिल रोजी अनेक कर्जदार आपल्या विविध समस्या मांडण्यासाठी निर्भय महाराष्ट्र संघटनेच्यावतीने अंबिका महिला पतसंस्थेच्या श्रीरामपूर कार्यालयात गेलो असता. त्यांचेशी उद्धट वागणूक करण्यात आली.सर्व कर्मचारी,व्यवस्थापक,जनसंपर्क अधिकारी यांनी एकच पाढा सुनावला की आम्ही माहिती देऊ शकत नाही.सहायक निबंधक यांनी न्यायालयात जा तेथून तुम्हाला माहिती देता येईल असे उत्तर दिल्याने कर्जदार संतापले.माहिती द्या म्हटले तर व्यवस्थापक म्हणतात कोर्टाकडून घ्या,त्यासाठी लेखी द्या मागणी केली तर मला लिहिता येत नाही.जे कर्जदार आले त्यांना तर माहिती दिलीच नाही.तेथे वाद विवाद झाल्यावर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सर्वाना ओळखपत्र घालण्यास सांगितले व दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकले व सामंजस्याची भूमिका घेतली.ह्या पतसंस्थेच्या एवढ्या तक्रारी असून त्या न सोडविता सर्वांच्या अंगावर धावून जाणे,धमक्या देणे असे प्रकार पतसंस्थेकडून घडतात याची प्रशासनाने,पोलीस विभागाने दखल घेणे गरजेचे आहे अन्यथा लवकरच महाराष्ट्र राज्यातील निर्भय महाराष्ट्र राज्य या संघटनेचे निर्भयसैनिक या कर्जदारावर होणाऱ्या अन्यायाच्या चौकशीसाठी अंबिका पतसंस्था येथे येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शितल गोरे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.