शिवप्रहार न्यूज- उपचारानंतर अर्धांगवायू झालेला बेलापुरातील तरुण लागला चालायला…

शिवप्रहार न्यूज- उपचारानंतर अर्धांगवायू झालेला बेलापुरातील तरुण लागला चालायला…

उपचारानंतर अर्धांगवायू झालेला बेलापुरातील तरुण लागला चालायला…

 श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे राहणारा क्षीरसागर नावाच्या तरुणाला काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. 

         झटका आल्यापासून त्याला चालता येत नव्हते तो अंथरुणाला खिळला होता.परंतु बेलापूर बुद्रुक येथील श्री.साई पावन प्रतिष्ठान चे अध्यक्ष कैलास चायल यांनी बेलापुरात एक आरोग्य शिबिर भरवले होते.या शिबिरात तरुणावर उपचार करण्यात आले.

        या उपचारानंतर तो तरुण हळूहळू चालण्याचा प्रयत्न करू लागला व आता त्याला स्वतःच्या पायावर उभा राहता येत आहे.समाज उपयोगी आरोग्य शिबिरामध्ये या तरुणाला असा लाभ झाला.