शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात नशेच्या गोळ्या, इंजेक्शनची विक्री;१६ मोबाईलसह आरोपी पकडला...

श्रीरामपुरात नशेच्या गोळ्या, इंजेक्शनची विक्री;१६ मोबाईलसह आरोपी पकडला...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुरात नशेच्या गोळया व इंजेक्शन्सची विक्री करणार्या तरुणाला श्रीरामपूर शहर पोलीसांनी अटक करत त्याच्याकडून नशेच्या गोळ्या व इंजेक्शनच्या औषधी बाटल्या तसेच 16 मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रकरणी मतीन मेहबूब शेख (वय 19), रा. नेहरूनगर, वॉर्ड नं 1, श्रीरामपूर याला अटक केली असून त्याचा भाऊ अलेक्स उर्फ मुस्तकिम मेहबूब शेख व ख्वाजा पटेल यांचा पोलीस शोध घेत आहेत. काल निरीक्षक नितीन देशमुख यांना गोपनिय माहिती मिळाली की, मतीन शेख, श्रीरामपूर हा वॉर्ड नं 7 श्रीरामपूर परिसरात नशेच्या गोळया व इजेक्शन्सची विक्री करण्यासाठी येणार आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन पोलीसांनी सापळा लावुन मतीन याला ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात मेफेटरमीन इंजेक्शनच्या (टर्मिव्हीया) व नेफेटरमीन इंजेक्शनच्या नावाच्या गुंगीकारक व मानवी शरीराला अपायकारक असलेल्या बाटल्या मिळून आल्या.
सदर इन्जेक्शन विक्री करण्याचा त्याच्याकडे कुठलाही परवाना नसुन असे इंजेक्शन कुठल्याही वैद्यकीय अधिकार्याची पावतीही त्याच्याकडे मिळून आली नाही. त्यामुळे मतीन शेख याच्या विरुध्द तसेच सदर इंजेक्शन त्याला पुरविणारा त्याचा भाऊ अलेक्स उर्फ मुस्तकिम मेहबुब शेख व ख्वाजा पटेल यांच्याविरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात बी.एन.एस. 2023 चे कलम 123 व इतरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि. गणेश जाधव, पोसई रोहिदास ठोंबरे, पोसई निकम तसेच पोको संपत बडे, अजित पटारे, पोको आंबादास आंधळे, संभाजी खरात, पोकॉ.अभंग, रवी शिंदे, सागर बनसोडे, अमोल पडोळे, आजिनाथ आंधळे, धनंजय वाघमारे, अनिता गिते, सुन्तोडे बाळासाहेब गिरी यांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि गणेश जाधव हे करीत आहेत.