शिवप्रहार न्यूज- मुल्ला कटरचा अजुन एक साथीदार “गुफ्या”श्रीरामपूर शहर पोलिसांनी नेवासा फाट्यावर धरला…
मुल्ला कटरचा अजुन एक साथीदार “गुफ्या”श्रीरामपूर शहर पोलिसांनी नेवासा फाट्यावर धरला…
श्रीरामपूर- मा. पोलीस अधीक्षक सो, नगर, राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांनी हद्दीतील तसेच परहदीतील फरार आरोपींची माहिती काढुन, त्यांना जेरबंद करणेबाबत सुचना मा. पोलीस निरीक्षक सो, हर्षवर्धन गवळी यांना दिल्या होत्या. त्यात महाराष्ट्रभर गाजलेल्या मुल्ला कटर, लव्ह जिहाद व वेश्याव्यवसाय या प्रकरणातील तपास अधिकारी श्री संदिप मिटके साहेब, एस.डी.पी.ओ. श्रीरामपुर यांनी श्री हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक, श्रीरामपुर शहर यांना यातील फरार आरोपींना पकडुन आणण्याचे आदेश दिले.
त्यानुसार श्री हर्षवर्धन गवळी यांनी श्रीरामपुर शहर तपास पथकास यातील आरोपींना शोधण्याच्या सुचना देवून रवाना केले.वरील प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना, मा. पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी यांना माहिती मिळाली की, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७३३/२०२२ भादवि कलम ३७६ वगैरे गुन्ह्यातील फरार आरोपी नामे गुफरान निसारखान पठाण ऊर्फ गुफ्या हा नेवासाफाटा परीसरात येणार आहे. त्यामुळे मा. पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी यांनी मा.एस.डी.पी.ओ. श्रीरामपुर विभाग, संदिप मिटके यांना सदरबाबत माहिती देवून तात्काळ तपास पथक आरोपीचे शोध कामी रवाना केले.दिनांक ०१/११/२०२२ रोजी पहाटे ०२/०० वा. चे सुमारास तपास पथक सापळा लावुन बसले असता, तेथे मिळालेल्या वर्णनाचा इसम आला असता, त्यास शिताफिने झडप घालून पोलीसांनी पकडले असता, त्याने त्याचे नाव गुफरान निसारखान पठाण ऊर्फ गुफ्या, रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपुर असे सांगितले.
त्यानुसार त्यास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे आणुन, त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके हे करीत आहेत.काही दिवसांपूर्वी मालेगाव येथुन मुल्लाच्या ०२ साथीदारांना शहर पोलिसांनी धरुन आणले होते.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांचे आदेश व सुचनांप्रमाणे सपोनि जिवन बोरसे, पो.ना./ रघुवीर कारखेले, पो. कॉ. गौतम लगड, पो. कॉ. राहुल नरवडे, पो.कॉ./ रमिझराजा अत्तार, पो. कॉ. गणेश गावडे, पो.कॉ. गौरव दुर्गुळे व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपुर येथील पो.ना./ फुरकान शेख यांनी केली यांनी केली आहे.