शिवप्रहार न्युज - ओव्हरब्रीजजवळ अपघात; पती-पत्नीचा मृत्यू...

ओव्हरब्रीजजवळ अपघात; पती-पत्नीचा मृत्यू...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर-नेवासा मार्गावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका टँकरने मोटारसायकलला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुधाच्या टँकरने (क्र. एमएच १७ बीझेड १२२१) मोटारसायकलला (क्र. एमएच १७ सीजे ८५२४) मागील बाजूने जोराची धडक दिली. यात सुनील थोरात व त्यांच्या पत्नी स्वाती थोरात गंभीर जखमी झाले होते. अपघातस्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. जखमींना साखर कामगार हॉस्पिटलमध्ये देण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा दुधाचा टँकर हा भरधाव वेगाने श्रीरामपूरकडे येत होता. थोरात हे राहाता तालुक्यातील एकरुखे येथील रहिवासी होते. ते सध्या श्रीरामपूर शहरात स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.