शिवप्रहार न्यूज- १६ वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करून खोट्या ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या प्राचार्या बोधक बाईंवर श्रीरामपुरात गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्यूज- १६ वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करून खोट्या ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या प्राचार्या बोधक बाईंवर श्रीरामपुरात गुन्हा दाखल…

१६ वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण करून खोट्या ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या प्राचार्या बोधक बाईंवर श्रीरामपुरात गुन्हा दाखल…

 श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)-श्रीरामपूर शहराजवळ असणाऱ्या वडाळा महादेव येथील अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती बोधक यांनी एका 16 वर्षाच्या मुलाला कॉलेजच्या आवारात मारहाण करून तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करील अशी धमकी आज 18 ऑक्टोबर रोजी सकाळी दिली. या प्रकरणावरून कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती बोधक यांच्याविरोधात आज श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

       या प्रकरणाची अधिक हकीकत अशी की, या गुन्ह्याच्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे फिर्यादी विकास सोन्याबापु जाधव वय 37 वर्ष, धंदा-सलून, रा-गोंधवणी रोड, वार्ड नंबर-1, श्रीरामपूर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव, तालुका श्रीरामपूर येथे त्यांचा मुलाचे कॉलेजातील एका मुलाबरोबर वाद झाले होते त्यामुळे कॉलेजमधील प्राचार्या बोधक मॅडम यांनी माझ्या मुलाला मारहाण केली व तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करील अशी धमकी दिली. या हकीकतीची तक्रार दिल्यावरून भा.दं.वी कलम 323, 506 प्रमाणे श्रीरामपूर शहर पो.ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        गेल्या वर्षी देखील याच कॉलेजमधील मुजोर शिपाई धनंजय साळुंखे याने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले होते. त्याच्यावर देखील कॉलेजच्या प्रमुखांनी योग्य ती कारवाई केली नव्हती. आज देखील कॉलेज प्रमुखाला सदर घटनेची माहिती दिली परंतु यावर देखील त्यांनी काहीही कारवाई केली नाही.म्हणून शेवटी विद्यार्थ्यांच्या पालकाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार केली. तरी 16 वर्षाच्या मुलाला मारहाण करून खोट्या ॲट्रॉसिटीची धमकी देणाऱ्या प्राचार्या बोधक बाईंवर योग्य ती कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मुलाच्या पालकाने दिला आहे.

       खोट्या ॲट्रोसिटीच्या अशा वृत्तीमुळे खरी ॲट्रोसिटी देखील खोटी वाटु लागते. जो जातीवाचक बोलतो, उच्च-निच असा जातीवाद करतो त्या जातीवाद्यांवर नक्की ॲट्रोसिटी व्हावी. पण प्राचार्य पदावरील बोधक बाईंसारख्या शिकलेल्या व्यक्तीने १६ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करुन खोट्या ॲट्रोसिटीची धमकी देणे हि बाब गंभीर असुन आपल्या समाजाचे ऐक्य भंग करणारी आहे. 

      तसेच प्राचार्या श्रीमती बोधक यांनी या विद्यार्थ्याला कॅालेजमधुन रस्टीगेट करण्याची देखील धमकी दिली असल्याचे विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले.