शिवप्रहार न्यूज- कोरोना लसीकरण केंद्रावर वशिलेबाजीमुळे उडाला गोंधळ...
कोरोना लसीकरण केंद्रावर वशिलेबाजीमुळे उडाला गोंधळ...
निपाणी वडगाव-श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे कोरोना लसीकरण केंद्रावर २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते.त्यामुळे १८ वर्षापुढील नागरिकांनी पहाटे ५ वाजेपासून नंबर लावण्यास सुरवात केली होती.
सकाळी ९ वाजेपर्यंत ७०० ते ८०० नागरिक लासिकरणासाठी येऊन थांबलेले असताना आरोग्य केंद्रवरून लस येताच गावातील काही प्रतिष्ठित आणि मोठ्या लोकांनी नोंदणी न करता अवघ्या ५ मिनिटात २० लोकांचे लसीकरण वशिले बाजी करून करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.त्यामुळे पहाटेपासून लसिकरणासाठी नंबर लावून बसलेल्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आणि बघता बघता लसीकरण केंद्रावर भयंकर गोंधळ झाला.
यात नागरिकांमध्ये चिडचिड होवुन धक्काबुक्की होण्यास सुरवात झाली.त्यानंतर पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले.पोलीस प्रशासन आल्यानंतर पहाटे पासून जसे नंबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने लिहून घेतले त्याप्रमाणे लसीकरण शांततेत करण्यात आले.
गोरगरीब जनता आपली रोजंदारी सोडून लसीकरण करण्यासाठी नियमांचे पालन करून रांगेत उभे असताना प्रतिष्ठित आणि धनवान लोकांच्या वशिलेबाजीने हा सर्व प्रकार घडला असल्याचे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले.या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मेडीयावर व्हायलरल झालेला आहे.