शिवप्रहार न्यूज - डोक्यात दगड घालुन खुन करणारे ०२ आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद;नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
डोक्यात दगड घालुन खुन करणारे ०२ आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद;नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
नगर-
सदर बातमीची हकिगत अशी, फिर्यादी सौ. वंदना घोरपडे, वय 28, रा. लालटाकी, भारस्कर कॉलनी, अहमदनगर या व त्यांचे पती लखन अनिल घोरपडे असे लालटाकी येथील ज्युसची गाडी जवळ बसलेले असताना ज्युसचे गाडीचा मालक मुन्नाभाई याने चेष्टेत फिर्यादीचे पती लखन याचे अंगावर पाणी फेकले.त्यावेळी लखन याने खाली पडलेली फरशी मुन्नाभाई याचेकडे फेकल्याचे नाटक करत असताना फरशी मागे पडली.त्यावेळी सिध्दार्थ नगर येथील तीन इसम नामे 1) सनी डाके, 2) दिपक चांदणे व 3) हंट्या शिंदे असे एका मोटार सायकलवर येवुन फिर्यादीचा पती लखन घोरपडे यास आम्हाला फरशी मारतो का असे म्हणुन डोक्यात दगड मारुन जखमी करुन जिवे ठार मारले. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 656/2023 भादविक 302, 34 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना ना उघड गुन्हा उघडकीस आणणे करीता पथक नेमुण समांतर तपास करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोहेकॉ/देवेंद्र शेलार, सुरेश माळी, पोना/विशाल दळवी, पोकॉ/सागर ससाणे व चापोना/भरत बुधवंत अशा पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन खुन करणारे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक अहमदनगर शहरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे सनी डाके व दिपक चांदणे हे कोठेतरी पळुन जाण्याच्या तयारीत असुन माळीवाडा बस स्टॅण्डच्या दिशेने गेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पथकाने लागलीच माळीवाडा बसस्टॅण्ड परिसरात जावुन सापळा लावुन थांबलेले असताना बातमीतील वर्णना प्रमाणे दोन संशयीत इसम बसस्टॅण्डच्या दिशेने येताना दिसले. पथकाची खात्री होताच त्यांना पकडण्याचे तयारीत असताना ते पोलीस पथकाची चाहुल लागताच पळुन जावु लागल. पथकाने संशयीतांचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) सनी संजय डाके, वय 19, 2) दिपक रावसाहेब चांदणे, वय 28 दोन्ही रा. सिध्दार्थनगर, झोपडपट्टी, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वर नुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.