शिवप्रहार न्युज - TV केबलच्या वायरमध्ये करंट एकाचा मृत्यु! चालकावर गुन्हा!!

TV केबलच्या वायरमध्ये करंट एकाचा मृत्यु! चालकावर गुन्हा!!
अहिल्यानगर ( शिवप्रहार न्युज) नगर शहरात टिव्हीच्या केबल ठिकठीकाणी बेकायदेशीर सरकारी खांबावरून खाजगी इमारतीवरून नेण्यात आल्या आहेत.काही केबल व्यावसायिकांच्या निष्काळजीपणा व बेजबाबदार पणामुळे केबल वायर मध्ये विज प्रवाह/करंट उतरून घराच्या लोखंडी जिन्यात करंट शिरुन या करंटला चिटकून सचिन भोजेल्लु वय ४५ यांच्या बळी गेला आहे.
सदर घटना नगर शहरात गणपती मंदिरासमोर गवळीवाडा,भिंगार येथे घडली . या प्रकरणी मयताच्या नातेवाईक रेखा सचिन भोजेल्लु यांनी भिंगार पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी केबल व्यवसायिक फरिद शेख रा.भिंगार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६,(१ ) प्रमाणे सदोष मनुष्यवधाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ . म्हस्के हे पुढील तपास करीत आहेत.
सरकारी खांब ,खाजगी इमारती,रस्ते या सर्वच ठिकाणावरून बेजबाबदारपणे टिव्ही च्या केबल शहरात टाकण्यात आल्या आहेत. त्यांना कोणी परवानगी दिली? महानगर पालिका, महावितरण, बांधकाम विभाग या बेकायदा केबल टाकण्यावर कारवाई का करत नाही ? काही नियम अटी आहे का नाही ? एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेला. आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल गवळीवाडी परिसरातील नागरिकांनी केला आहे .