शिवप्रहार न्यूज- १९ वर्षीय तरूणाचा दिवसा गळफास...

शिवप्रहार न्यूज-  १९ वर्षीय तरूणाचा दिवसा गळफास...

१९ वर्षीय तरूणाचा दिवसा गळफास...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - काल गुरूवार दि. २७ एप्रिल रोजी सुमारास बेलापूर-पढेगाव रोडवर घरात उमेश संखाराम केळकर या १९ वर्षीय तरुणाने दिवसा गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास तरुणाने आत्महत्या केल्याचे समजताच परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. सदर तरूण हा आपल्या नातेवाईकांकडे रहायला आला होता आणि आपल्या नातेवाईकांच्याच दुकानात काम करीत असल्याचे समजते. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उमेश केळकर याने गळफास घेवून आत्महत्या का केली? कोणत्या कारणाने केली? याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.