शिवप्रहार न्युज - १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार;स्नॅपचॅटव्दारे झाली होती ओळख…

१५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार;स्नॅपचॅटव्दारे झाली होती ओळख…
नेवासा ( शिवप्रहार न्युज) अल्पवयीन मुलींना मोबाईल देणे किती घातक ठरत आहेत हे विविध भयंकर घटनांवरून समोर येत आहे . नेवासा तालुक्यातील एका १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला आरोपी रविन्द्र गंगाधर मगर या २६ वर्षे वयाच्या तरुणाने स्नॅपचॅटव्दारे जवळीक साधून,श्रीमंतीचे , लग्नाचे अमिष दाखवून,या अल्पवयीन विद्यार्थीनीला गवतात बळजबरीने नेवून,तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेवून तिच्यावर बलात्कार केला.
तसेच आरोपी मगरने घडलेले कोणाला सांगू नको,तुला व मला मारतील अशी भिती घालून पुन्हा मोबाईलवर स्नॅपचॅट वर मेसेज करून आली नाही तर घरी सांगेल असे धमकावून अल्पवयीन विद्यार्थीनीवर पुन्हा लैगीक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पिडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी रविंन्द्र मगर रा.लोहगांव ता . नेवासा याच्या विरुद्ध सोनई पोलीसात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२ )(१ )(M),६९ ,३५१ (२ ) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी घटनेचे गांभिर्य ओळखून सोनई पोलीसांनी आरोपी मगरला अटक केली असून पुढील तपास पोनि माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मेढे हे करीत आहेत . या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली असून मुली मोबाईल वर काय करतात ? व्हॅट्सअपवर काय करतात ? व आता स्नॅपचॅटवर कोण कोणाशी संपर्क करतो ? यावर जागरूक कुटुंबानी आता लक्ष ठेवणे आवश्यक झाले आहे.