शिवप्रहार न्यूज-MIDC येथील झेन कंपनीत दरोडा टाकून कॉपर पट्टया चोरुन नेणारे श्रीरामपूरच्या आरोपींचा सहभाग असणारे सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद; LCB ची कारवाई…
MIDC येथील झेन कंपनीत दरोडा टाकून कॉपर पट्टया चोरुन नेणारे श्रीरामपूरच्या आरोपींचा सहभाग असणारे सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद; LCB ची कारवाई…
अहमदनगर( प्रतिनिधी )एमआयडीसी येथील झेन कंपणीमध्ये दरोडा टाकून कॉपर पट्टया चोरुन नेणारे सराईत गुन्हेगार ७,२ ९ , ००० / - रु . ( सात लाख एकोणतीस हजार रुपये ) किं . चे मुद्देमालासह जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई . प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि , फिर्यादी श्री . शिवाजी भागाजी कुदनर , वय ४१ वर्षे , रा . आदर्शनगर , नागापूर , अहमदनगर हे एमआयडीसी अहमदनगर येथील झेन इलेक्ट्रॉनीक कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करीत असून दिनांक २२ / १० / २०२१ रोजीचे पहाटे ०४.४० वा . सुमा . सदर कंपनीमध्ये वॉचमन नामे सोन्याबापु विजय पळसकर व विलास परासराम नेवसे हे कंपनीमध्ये डयूटीवर असतांना अनोळखी ६ ते ७ चोरटयांनी कंपनीमध्ये जावुन वॉचमन यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन व जिवे मारण्याची धमकी देवन व कंपनीमधील १७ सीसीटीव्ही कॅमेरे फोडुन कंपनीचे शटर लोखंडी कटावणीने तोडुन कंपनीमधील १७,५०,००० / - रु . किमतीच्या चांदीचा मुलामा असलेल्या कॉपर पटयांचे १० बॉक्स दरोडा टाकुन चोरुन नेले होते .
सदर घटने बाबत फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन गुरनं . ६ ९९ / २०२१ भादवि कलम ३ ९ ५ , ४५२,३२४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर , मा . अपर पोलीस अधीक्षक साो , अहमदनगर , मा . उपविभागीय पोलीस अधीकारी , नगर ग्रामिण विभाग तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन फिर्यादी व साक्षीदार यांचेकडून आरोपींची माहिती घेतली . त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अहमदनगर यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले .
पथकातील अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबन्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा सिताराम कु - हाडे रा . वडगाव गुप्ता याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असुन सिताराम कुन्हाडे हा आता वडगाव गुप्ता येथील पाण्याचे टाकीजवळ येणार आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे , पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे , पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय वेठेकर , पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप पवार , पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस नाईक सुरेश माळी , पोलीस नाईक शंकर चौधरी , पोलीस नाईक विशाल दळवी , पोलीस नाईक दिपक शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते , पोलीस कॉन्स्टेबल मेघराज कोल्हे , पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे , पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुड , पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे व चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड अशांनी मिळुन वडगाव गुप्ता येथे जावुन मिळालेल्या बातमी नुसार सापळा लावुन आरोपी नामे ( १ ) सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भानुदास कुन्हाडे वय ३३ मुळ रा . चितळी रेल्वे स्टेशन , चितळी , ता . राहता हल्ली रा . वडगाव गुप्ता अ.नगर यास ताब्यात घेतले त्याचेकडे नमुद गुन्हया बाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार नामे राहुल जाधव रा . प्रवारा संगम ता . नेवासा , आकाश भोकरे रा . कायगावटोक , ता . गंगापुर जि . औरंगाबाद , पंकज गायकवाड रा . गोधवणी ता . श्रीरामपुर , सागर मांजरे रा . श्रीरामपुर , सतिष शिंदे रा . गणेश चौक , बोल्हेगाव , कापसे रा . कॉटेज कॉर्नर अ.नगर अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली . त्यांनतर आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे साथीदार आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे ( २ ) राहुल सुरेश जाधव वय २१ रा . पाण्याचे टाकी जवळ , प्रवारा संगम ता . नेवासा ( ३ ) पंकज बापु गायकवाड वय २७ रा . गोधवणी ता . श्रीरामपुर ( ४ ) आकाश रामचंद्र भोकरे वय २३ रा . कायगावटोक , ता . गंगापुर जि . औरंगाबाद यांना वेगवेगळया ठिकाणाहुन ताब्यता घेतले आहे . तसेच उर्वरीत साथीदारांचा शोध घेतला असता ते मिळुन आलेले नाहीत . ताब्यात घेतलेल्या आरोपीतांकडे गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालाबाबत व सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या वाहना बाबत चौकशी केली असता आरोपींनी चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी २,२ ९ , ००० / - रु . किमतीच्या २२ ९ किलो वजनाच्या कॉपर पट्टया व गुन्हा करण्यासाठी वापरलेला ५,००,००० / -रु . किमतीचा एक टाटा कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच -२० ईएल ५६६ ९ असा एकूण ७,२ ९ , ०००० / - रु . किमतीचा मुद्देमाल समक्ष हजर केल्याने तो जप्त करण्यात आला आहे . आरोपी नामे सिताराम उर्फ शितल उर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे यास विश्वासात घेवुन आनखी कोठे कोठे गुन्हे केले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता त्याने वैजापुर जिल्हा औरंगाबाद येथे दारुचे गोडवून फोडुन चोरी केल्याची कबुली दिली असुन सदर चोरी बाबत वैजापुर पो . स्टे . औरंगाबाद येथे गु.र.नंवर २५८/२०२१ भा.द.वि. कलम ४६१ प्रमाणे दाखल आहे . वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापूर्वी दरोडा , चोरी , बेकायदा गावटी कट्टे जवळ बाळगणे , विनयभंग , दारु व जुगार यास्वरुपाचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत .आरोपींना मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे . पुढील कार्यवाही एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे .
सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभकुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . अजित पाटील साहेब , उपविभागीय पोलीस अधीकारी , नगर ग्रामिण विभाग , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.