शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यावर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात केला गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यावर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात केला गुन्हा दाखल...

श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यावर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात केला गुन्हा दाखल...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपुरात चायना मांजा विक्रेत्यांवर नगरपरिषदेने छापा टाकत पोलिसात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नगरपरिषदेमार्फत कडक कारवाई केली जाणार आहे. शहरात नायलॉन (चायना) मांजा विक्री करणाऱ्यांची माहिती नगरपालिकेला देण्यात यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सांगितले.

      संगमनेर रोडवरील एका कॉर्नर समोरील पतंग व मांजा विक्रेत्याकडे नायलॉन मांजा आढळून आल्याने त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

         मकरसंक्रांत जवळ आल्याने शहरामध्ये पतंगबाजी सुरु झाली आहे. या पतंगांना बंदी असलेला घातक नायलॉन मांजाच वापरत असल्याने अपघात होत आहेत. माणसांसह पशु पक्षी जखमी होत आहेत.यापुढेही नायलॉन मांजा विक्रेत्यांवर नगरपरिषदेमार्फत कडक कारवाई केली जात आहे.