शिवप्रहार न्यूज- “एड्स”ने एकाचा मृत्यू ! तर गळफास विषाने दोघांचा मृत्यू !!

शिवप्रहार न्यूज- “एड्स”ने एकाचा मृत्यू ! तर गळफास विषाने दोघांचा मृत्यू !!

“एड्स”ने एकाचा मृत्यू ! तर गळफास विषाने दोघांचा मृत्यू !!

संगमनेर /नगर (शिवप्रहार न्युज)-संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा परिसरात राहणारा तरुण मंगेश चिमा आगीवळे ,वय २५वर्षे यांने राहत्या घराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाला रात्रीच्या वेळी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या नातेवाईकांनी तशी खबर दिल्यावरून घारगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मंगेश या तरुणांने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली ? का आणखी काही प्रकार आहे ? याचा पुढील तपास पोना गाडे हे करीत आहे .    

      तर दुसऱ्या घटनेत अकोले तालुक्यातील पिंपळगाव दरी परिसरात राहणारा तरुण विजय देवराम मधे,वय 40 वर्षे याने राहत्या घरात काहीतरी विषारी औषध पिल्याने त्याला उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान विजयचा मृत्यू झाला . त्यांने नेमके कोणते विषयावर औषध पिले ? का पिले ? कसे पिले ? याचा पुढील तपास पोना तळपे हे करीत आहे.

    तर पारनेर तालुक्यातील यादववाडी वाडेगव्हाण परिसरात राहणारा इसम दीपक ,वय -49 वर्ष याला एडस म्हणजेच एचआयव्ही व टीबीचा आजार असल्याने पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार होत असलेल्या वार्डात दीपक चा मृत्यू झाला.या प्रकरणी सुपा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल शिंदे पुढील तपास करीत आहे.एचआयव्ही व टी बी ने मृत्यू झाल्याचे पोलीस खबरीत म्हटलेले आहे .