शिवप्रहार न्युज - जितेंद्र आव्हाडवर धार्मिक भावना दुखावल्याकारणाने "हेट स्पिच"या गुन्हा दाखल करण्याबाबत राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिले निवेदन...

शिवप्रहार न्युज -  जितेंद्र आव्हाडवर धार्मिक भावना दुखावल्याकारणाने "हेट स्पिच"या गुन्हा दाखल करण्याबाबत राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिले निवेदन...

जितेंद्र आव्हाडवर धार्मिक भावना दुखावल्याकारणाने "हेट स्पिच"या गुन्हा दाखल करण्याबाबत राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिले निवेदन...

नगर -नुकतेच राष्ट्रीय वारकरी परिषदेने दिले पोलीस प्रशासनास दिलेलं निवेदन खालील प्रमाणे आहे.

महोदय, 

राम कृष्ण हरी!हा मंत्र शिवाचा !!म्हणती जे वाचा! तया मोक्ष !! या हरीपाठातील श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही जगभरातील वारकरी संप्रदाय भगवान प्रभू श्रीरामचंद्रांची उपासना, भक्ती, भजन करीत असतो. प्रभू श्रीरामचंद्र हे आमचे आराध्य दैवत असून आदर्श पुरुष मानले गेले आहेत. वनामध्ये १४ वर्षे राहून त्यांनी फळे, कंदमुळे खाल्ली फलहार करून त्यांनी जीवन व्यतीत केले. हे त्यांचे चरित्र लिहिणाऱ्या वाल्मिकी रामायणात लिहिले आहे. 

       रामायण अशा पवित्र ग्रंथात भगवान श्रीरामाने मांसाहार केलेला आहे, असा उल्लेख कुठे नसताना प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊनच आम्ही सर्व वारकरी बांधव शाकाहारी जीवन शैली अवलंबलेली आहे. अशा आमच्या प्राणप्रिय प्रभू रामचंद्रावर आक्षेप आरोप श्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे. त्यांचे सर्व व्हिडिओ सर्वत्र दूरदर्शन वाहिनीवर दाखवले जात आहेत सोशल मीडिया द्वारे ही हे दाखवले जात आहे. आज संपूर्ण जगात श्रीरामाच्या मंदिराबाबत आनंदाचे वातावरण असताना समाजात द्वेष, विकल्प, तेढ निर्माण करण्याचे काम आमदार जितेंद्र आव्हाड करत आहेत. हे ते जाणीवपूर्वक हेतू पुरस्सर अनेक वेळा अशी विधान करत असतात. ते ज्या विभागातून निवडून येतात तो विभाग मुस्लिम बहुल आहे त्यांना खुश करण्यासाठी अशी विधाने ते सातत्याने करत असल्याने व श्रीरामाचे मंदिर होण्याच्या पूर्वसंध्येला हे वक्तव्य करून त्यांनी आमच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्याचे वक्तव केल्याने त्यांच्यावर ""हेट स्पीच"" चा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही समस्त नगर जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे वारकरी व हिंदुत्ववादी करीत आहोत. अन्यथा आम्हास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. त्यामध्ये अघटीत, अयोग्य असे काही घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाचीच राहील. 

       अशा अशा स्वरूपाचे निवेदन राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.