शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात जनतेतुनच नगराध्यक्ष तसेच ०३ जणांचा एक प्रभाग...
श्रीरामपुरात जनतेतुनच नगराध्यक्ष तसेच ०३ जणांचा एक प्रभाग...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर नगरपालिकेची मुदत संपुन सुमारे दोन वर्षे होवुन गेली असुन मुख्याधिकारी गणेश शिंदे हे अतिशय जबाबदारीने पालिकेचा कारभार हाकत आहे.
आता पालिकेची निवडणूक कधी होणार याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती.मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे च्या पहिल्या आठवड्यात श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत असून काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा नगरपालिकांसाठी ०३ जणांचा एक प्रभाग याला मंजुरी देण्यात आली.तर जनतेतून नगराध्यक्ष निवडून देण्याचा कार्यक्रम जैसे थे ठेवण्यात आला. त्यामुळे आता श्रीरामपूर नगरपालिकेची एप्रिल अथवा मे मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तीन जणांचा एक प्रभाग व जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार हे निश्चित झाले असून मागील पंचवार्षिक निवडणुकीत जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी ऐतिहासिक विजय मिळवीत काँग्रेसच्या श्रीमती राजश्री ससाणे यांचा दारुण पराभव केला होता.
आता राजकीय गणिते बदलली असली तरी नगराध्यक्ष पद खुले राहते का आरक्षित ? यावर बरेच राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. एकंदर आता लोकसभेच्या निवडणुकीतच पालिकेचाही प्रचार होणार हे नक्की.