शिवप्रहार न्यूज- अल्पवयीन मुलीवर बलात्कार! होमगार्डला अटक! वासराची सुटका! ऑनलाईन फसवणुक ! 

शिवप्रहार न्यूज- अल्पवयीन मुलीवर बलात्कार! होमगार्डला अटक! वासराची सुटका! ऑनलाईन फसवणुक ! 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार! होमगार्डला अटक! वासराची सुटका! ऑनलाईन फसवणुक ! 

श्रीरामपूर / संगमनेर ( शिवप्रहार न्युज ) - श्रीरामपूर शहरात दत्तनगर परिसरात राहणारा होमगार्डचे काम केलेला आरोपी अनिल छगन बनकर ,वय ४२ याने १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली असून या घटनेने दत्तनगरसह श्रीरामपूर परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली असून आरोपी विवाहीत असून त्याला बायको तीन मुले असल्याचे समजते . एका १६ वर्षाच्या लहान मुलगी विद्यार्थीनिचा ती शाळेत जातांना पाठलाग करून आरोपीने लॉजवर व त्याच्या घरात या निष्पाप लहान मुलीवर अत्याचार केला .त्याने लहान मुलीला अमिष दाखवले ! 

     मुलीच्या वडीलांनी शहर पोलीसात फिर्याद दिल्या वरून  भादवि कलम ३५४, ३५४ (ड) ,३७६ ( २ ) ( एन ) बालकांचे लैगीक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम ३ , ४, ५ . (एल) ८ ,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिल छगन बनकर या नराधमाला पोलीसांनी अटक केली असून अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर ,डीवायएसपी संदिप मिटके, पोनि गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई देवरे हे पुढील तपास करीत आहे . 

      तर श्रीरामपूर शहरात डॉ.शिरसाठ हॉस्पीटल मागे रेल्वे रूळाजवळ ०४ गोवंश वासरे कत्तलीसाठी बाधून निर्दयी पणे बांधून ठेवली होती. त्याची सुटका करण्यात आली.पोकॉ गौतम शंकर लगड यांच्या फिर्यादी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

      तसेच एका घटनेत संगमनेर तालुक्यातील शेतकरी भागवत मल्हारी गागरे यांच्या इंडीयन ओरेसीस बॅन्के च्या खात्यातून आधार कार्ड नंबर लींक करून ६ लाख ८० हजाराची फसवणूक करण्यात आली. गागरे यांच्या तक्रारी वरून आधार कार्ड नंबर ४ ७७ १ ५ १ ९ ३ ४ २ ९ ७ या आरोपीवर सायबर पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.पोनि भोसले पुढील तपास करीत आहेत . ऑनलाईन व्यवहारात फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत .