शिवप्रहार न्यूज -चुलतीने दांडक्याने पुतण्या च्या पायाच्या नडगीला केले फ्रॅक्चर
चुलतीने दांडक्याने पुतण्या च्या पायाच्या नडगीला केले फ्रॅक्चर ...
कोल्हार -
याबाबतची हकीकत अशी की, फिर्यादी अनिकेत राजेन्द्र शिन्दे ,वय २५ ,रा. दळेवस्ती,कोल्हार याने पोलीसात दिलेल्या फिर्यादीत सांगीतले की, आरोपी नंदकुमार शिन्दे ,प्रतिभा शिन्दे ,आदेश शिन्दे, वैभव शिंदे यांनी तु आमचे गिन्नी गवत का कापले ? असे विचारून जोरजोरात शिवीगाळ केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी अनिकेत ची चुलती प्रतिभा शिंदे हिने तिच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नडगी जवळ फ्रॅक्चर करून जखमी केले आणि तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले म्हणून लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 154/ 2021 भादवि कलम 325 ,324, 504 ,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुसळकर हे करीत आहेत.