शिवप्रहार न्यूज- आजपासुन श्रीरामपूर नगरपालिकेचा कार्यभार प्रांताधिकार्‍यांनी स्विकारला;विद्यमान नगरसेवक झाले माजी नगरसेवक…

शिवप्रहार न्यूज- आजपासुन श्रीरामपूर नगरपालिकेचा कार्यभार प्रांताधिकार्‍यांनी स्विकारला;विद्यमान नगरसेवक झाले माजी नगरसेवक…

आजपासुन श्रीरामपूर नगरपालिकेचा कार्यभार प्रांताधिकार्‍यांनी स्विकारला;विद्यमान नगरसेवक झाले माजी नगरसेवक…

श्रीरामपूर - नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी व जवळपास दोनशे कोटीचे बजेट असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेमधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ काल 29 डिसेंबर रोजी संपुष्टात आला. त्यामुळे आज दिनांक 30 डिसेंबर 2021 पासून श्रीरामपूरचे प्रांताधिकारी श्री.अनिल पवार यांनी शासनाच्या आदेशानुसार श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारला.

        त्यामुळे गत पंचवार्षिक मध्ये जे लोकप्रतिनिधी -नगराध्यक्ष व नगरसेवक होते.ते आता माजी पदाधिकारी म्हणून गणले जातील. कोरोना महामारी व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नामुळे नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिकांवर वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहेत.