शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात व्यापाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात व्यापाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल...

श्रीरामपुरात व्यापाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुरात इलेक्ट्रीक दुकानदारास किरकोळ कारणावरून मारहाण करत खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. 

   याबाबत, नंदकुमार पूनमचंद कोठारी, वय-६० यांनी पोलिसात फिर्याद आहे की, त्यात म्हटले आहे की, सकाळी ११ च्या सुमारास आपण व मुलगा मयूर दुकानासमोर असताना रूणवाल व त्यांची मुलगी, रा. चंद्ररूप कॉम्प्लेक्स, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर या आल्या व त्यांनी मिहीर रूणवाल याच्या दुकानाची चावी मागितली. मात्र, मिहीर याने आपल्याकडे चावी दिलेली असल्याने जर मिहीर याने फोन करून चावी द्यायला सांगितली तर आपण देवू, असे आपण म्हणाल्याचा राग आलयाने आपणास चापटीने मारहाण करत शिवीगाळ केल. तसेच दुकानात घुसून दुकानातील विक्रीसाठी ठेवलेला एलईडी टिव्ही फोडला.तसेच इलेक्ट्रीक वस्तूंचे बॉक्स खाली पाडून नुकसान केले. शिवीगाळ करत तू जर आमच्याकडे चावी दिली नाही तर तुझ्याविरूद्ध आम्ही खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावेळी माझ्या मुलाने व शेजारी दुकानदारांनी येवून समजूत काढत त्यांना दुकानाबाहेर नेले असे फिर्यादीत म्हटले आहे.

       नंदकुमार कोठारी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी किरण रूणवाल व त्यांची मुलगी यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३२३, ३४, ४२७, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.