शिवप्रहार न्यूज- यंदाचा महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील श्रीसाईबाबांच्या चरणी…
यंदाचा महाराष्ट्र केसरी पै.पृथ्वीराज पाटील श्रीसाईबाबांच्या चरणी…
शिर्डी-महाराष्ट्र केसरी- २०२२ किताब पटकाविलेले कुस्तीपट्टु पहिलवान पृथ्वीराज पाटील याने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. काल दि.२३ एप्रिल रोजी पृथ्वीराज शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आला होता.
मुळचा कोल्हापूरचा पै.पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरीचा विजेता झाला आहे. अटीतटीच्या लढतीत पृथ्वीराज पाटीलनं विशाल बनकरचा पराभव करुन महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली आहे. अंतिम सामन्यात विशाल बनकरवर त्याने 5-4 ने मात केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी एकच जल्लोष केला होता.