शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरातील हिंदूत्ववादी संघटनांचे प्रांताधिकार्यांना निवेदन…

श्रीरामपूरातील हिंदूत्ववादी संघटनांचे प्रांताधिकार्यांना निवेदन…
श्रीरामपूर -कर्नाटकातील एका महाविद्यालयाने हिजाब काढण्यास नकार देणार्या सहा विद्यार्थिनींना प्रवेशबंदी केली होती. मात्र हिजाब घालूनच आम्ही महाविद्यालयात येऊ, अशी भूमिका या विद्यार्थिनींनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून घेतली आहे. त्या प्रकरणावरुन सध्या कर्नाटक सह देशभरात वादंग निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी समानता, अखंडता आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे कपडे परिधान करावेत. शाळा, कॉलेज, विद्यापीठ येथे शिक्षण घेणारे सर्व समान पातळी वर असावीत म्हणून ठरावीक गणवेश नेमून देतात, सर्व विद्यार्थ्यांनी त्याचे पालन करावे असे निर्देश असतात.
परंतु कर्नाटक मधील एका कॉलेजात काही विद्यार्थिनींनी आम्हाला हिजाब घालून वर्गात बसण्याची मागणी केली.त्यांची मागणी नामंजूर करताच याला काहींनी धार्मिक वळण देत दोन समाजात तेढ निर्माण होईल अशाप्रकारे हे प्रकरण उचलून धरले. तसेच त्यावरून प्रचंड गदारोळ माजवण्यात आला.त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून कॉलेजमध्ये विरोध दर्शवला, परंतु सामाजिक एकोप्यास बाधा आणण्याच्या दुष्ट हेतूने, सदर प्रकरण चुकीच्या पद्धतीने सोशल मीडिया व इतर माध्यमातून प्रसारित केले. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही अनेक शहरांमध्ये अचानक धार्मिकतेचा रंग देऊन या प्रश्नाला हवा देण्याचा प्रयत्न केला गेला.जसे कि बीड शहरामध्ये पहिले हिजाब फिर किताब अशा प्रकारचे बॅनर बाजी केली.तसेच मालेगाव मध्ये कुठलाही संबंध नसताना महिलांचे या हिजाब प्रकरणा विरोधात मोर्चे काढले व अनेक ठिकाणी अशाच प्रकारे विरोध प्रदर्शन केला गेला.
वास्तविक पाहता हे प्रकरण कर्नाटक राज्यातल्या एका कॉलेज पुरते मर्यादित होते, परंतु त्यास देशव्यापी प्रश्न बनवले गेले. अशा देशद्रोही प्रवृत्तींना व वेळीच ठेचावे.नाही तर उद्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये धार्मिक वाद वाढीस लागतील. सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षणासाठी येतात तिथे कुठल्याही जातीत व धर्मात भेदभाव केला जात नाही असे असतानाही केवळ गरजेनुसार संविधान व इतर ठिकाणी आमच्या धार्मिक मान्यता असे दुटप्पी धोरण अवलंबले जाते व त्याची जबरदस्ती ह्या मुळे भविष्यात शैक्षणिक सह इतर क्षेत्रात सुद्धा याचे विपरित परिणाम दिसून येतील, त्यामुळे आमची प्रशासनास या निवेदनाद्वारे विनंती आहे की ,कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात व देशात हा वाद विकोपास जाऊ नये यासाठी शासनाने व प्रशासनाने योग्य असा निर्णय घेऊन, त्याची त्वरित सक्तीचे अंमलबजावणी करावी अन्यथा हिंदू देखील भगवे वस्त्र धारण करुन व हिंदू पारंपारिक पद्धतीने शाळा व महाविद्यालयामध्ये परिधान करण्यास परवानगी देण्यात यावी. भविष्यात होणार्या अनुचित घटना टाळाव्यात यासाठी प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले.
देशात अनेक ठिकाणी मुस्लिम सामाजाचे मदरसा व उर्दु शाळा हे देखील शासनाच्या नियमानुसार चालविण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कोणत्याही मदरसेमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे शाळा चालविली जात नाही. अशा मदरसाला शासनाने अनुदान का द्यावे ? नियमानुसार त्याठिकाणी शाळा जर चालविली जात नाही. तर अशा मदरसेला अनुदान बंद करण्यात यावे. या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या गणवेशाचा वापर होतो की नाही याचीही देखील सखोल चौकशी करावी. शासनाचे अनुदान घेऊन देखील गणवेश विद्यार्थ्यांना देत नसेल किंवा त्या पैशांचा स्व:हितासाठी वापर होत असेल तर अशा मदरसा, शाळा महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच यापुढे शाळा व कॉलेजमध्ये मुस्लीम युवती हिजाब घालून आले तर हिंदू युवती देखील हिंदू धर्मातील पोशाख परिधान करुन येतील व बौद्ध, ख्रिश्नच देखील आपल्या धर्माच्या पारंपारिक पोशाखात महाविद्यालयामध्ये येतील.
अशा पद्धतीने जर सुरु झाले तर पुढील काळामध्ये शाळा व कॉलेजमध्ये नमाज अदा करणे, हिंदू धर्मा प्रमाणे प्रार्थना करणे अशा प्रथा सुरु होतील. परंतु अशा या घटना होऊ नये कारण शाळा, कॉलेज हे सर्व धर्मासाठी ज्ञान प्राप्त करण्याचे स्थान आहे. म्हणून अशा जिहादी प्रचार व प्रसार करणार्या विद्यार्थीनींना किंवा युवतींवर कायद्याचे उल्लंघन केले म्हणून त्वरीत गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणे करुन महाविद्यालयामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही व यांच्या समर्थनार्थ आंदोलन, मोर्चे काढणार्या पक्ष, संघटनांच्या लोकांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा हिंदूत्वादी संघटना ह्यांना उत्तर म्हणून महिला, पुरुष, रस्त्यावर उतरुन तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेल. मग होणार्या परिणामास शासन, प्रशासन व शालेय व्यवस्थापन जबाबदार राहील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी असे श्रीरामपूरातील प्रांत कार्यालय येथे हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात याले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल राज्य उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, विश्व हिंदु परिषदचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप शिरसाठ, हिंदू एकता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे, मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल, बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, आरएसएसचे देविदास चव्हाण, विजय ढोले, शिवसेना युवा सेनेचे शहर प्रमुख निखिल पवार,प्रविण पैठणकर, सौ. पुष्पलता हरदास बीजेपी महिला आघाडी ओबीसीसेल (जिल्हाध्यक्ष) यांनी सदर घटनेचा निषेध करुन मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी “शिवप्रहार प्रतिष्ठान”चे चंदू आगे, श्रीराम सेवा संघाचे कुणाल करंडे, बंडूकुमार शिंदे, मनसे विधान सभा अध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ ,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष समर्थ सोनार, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष संतोष भालेराव, बाळासाहेब हरदास ,रोहित भोसले, विकास डेंगळे, योगेश ओझा, लखन उपाध्ये (तालुका उपाध्यक्ष) आध्यात्मिक आघाडीचे शहर प्रमुख रुद्रप्रताप कुलकर्णी, निलेश गिते, रविराज बेलदार, पंकज करमासे, प्रविण फरगडे, लखन माखिजा, सुरज यादव, मंगेश छतवाणी, आदेश मोरे, नितीन ललवाणी, प्रसाद कांबळे, किशोर वडितके, रमेश घुले, प्रविण शिंदे, विशाल अंभोरे, विजय आखाडे आदी हिंदुत्वादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.