शिवप्रहार न्युज - सातपूर-नाशिकच्या मेळाव्यात "शिवप्रहार"चा शांतिगिरी महाराजांना जाहीर पाठिंबा....
सातपूर-नाशिकच्या मेळाव्यात "शिवप्रहार"चा शांतिगिरी महाराजांना जाहीर पाठिंबा....
सातपूर/नाशिक- नाशिक शहरातील सातपूर येथील कुबेरनगर भागामध्ये आज दि.०७ मे २०२४ रोजी महामंडलेश्वर,१००८ हिंदू धर्मगुरू,स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्या मेळाव्यामध्ये "शिवप्रहार"च्या वतीने माजी PSI सुरजभाई आगे यांनी नाशिक लोकसभा मतदार संघाचे बादली चिन्हावर लढत असलेले, अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना लेखी पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला. पत्रात सांगण्यात आले की,०२ वर्षापूर्वी शिवप्रहारच्या वतीने राबविल्या गेलेल्या छत्रपती संभाजीनगर नामकरण मोहिमेला महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी मनापासून सहकार्य केले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मारेकऱ्याचे नाव हटवून त्यांचे नाव औरंगाबाद जिल्ह्याला लागणे ही आम्हा कट्टर मावळ्यां च्या वतीने शंभूराजांसाठी सर्वात मोठी श्रद्धांजली होती. त्यामध्ये बाबाजींनी मदत केली म्हणून "शिवप्रहार"च्या वतीने महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना बिनशर्त,निर्मळ मनाने पाठिंबा देण्यात आला आहे.
तरी दिनांक 20 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नाशिककरांनी बादली चिन्ह असलेल्या (क्रमांक 26)महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या नावासमोरील बटन दाबून त्यांना लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात म्हणजेच संसदेत पाठवावे आणि जसे राम मंदिर पूर्ण झाले तसेच नाशिक लोकसभेंतर्गत येणारे महाबली हनुमान यांची जन्मभूमी असलेल्या अंजनेरी येथे देखील भव्य हनुमान मंदिर महाराजांच्या हातून पूर्ण करून घ्यावे असे यावेळी सांगण्यात आले.