शिवप्रहार न्युज - अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे श्रीरामपूर पालिका कर्मचारी चव्हाण यांचा मृत्यू…
अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासामुळे श्रीरामपूर पालिका कर्मचारी चव्हाण यांचा मृत्यू…
श्रीरामपूर -येथील नगरपालिकेचे कर्मचारी नरेंद्र चव्हाण यांना उपमुख्य अधिकारी व ठराविक अधिकारी यांनी केवळ मानसिक त्रास देण्याच्या हेतूने एका महिन्यात ०३-०४ वेळा बदल्या करून तसेच मृत्यूच्या दिवशी त्यांच्यावर कामाचा प्रचंड दबाव टाकून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा आरोप जिल्हा पालिका कामगार कर्मचारी युनियनने केला आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी श्रीरामपूर प्रांत अधिकारी तथा पालिका प्रशासक श्री.सावंत यांना दिले आहे.
युनियन च्या ह्या निवेदनात त्यांनी उपमुख्य अधिकारी सय्यद व ठराविक अधिकारी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.या अधिकाऱ्यांच्या दबावामुळेच कर्मचारी नरेंद्र चव्हाण यांना कामाच्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.