शिवप्रहार न्युज - ST चालक-वाहकामुळे श्रीरामपुरातील विद्यार्थीनीला वेळेत उपचार...

शिवप्रहार न्युज -  ST चालक-वाहकामुळे श्रीरामपुरातील विद्यार्थीनीला वेळेत उपचार...

ST चालक-वाहकामुळे श्रीरामपुरातील विद्यार्थीनीला वेळेत उपचार...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)-आज दि. ०१ ऑक्टोबर रोजी खानापूर ते श्रीरामपूर बसमध्ये चालक-वाहक हे कर्तव्य करीत असताना मुठे वाडगाव येथे बस आली व विद्यार्थी घेऊन श्रीरामपूरकडे निघाली. त्यात एका तरुणीला खोकर फाट्याच्या आसपास चक्कर येऊन ती बसमध्ये पडली. प्रसंगावधानाने वाहक श्री.नागरगोजे व चालक श्री.शेख यांनी तिला त्वरित श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटल येथे उपचारकामी दाखल केले.    

         एसटीमध्ये कामगिरीवर असणारे चालक शेख व वाहक नागरगोजे यांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीवर वेळीच उपचार करण्यात आले. चालक- वाहक यांनी वेळेचे गांभीर्य पाहून या मुलीला योग्य तो उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.त्याबद्दल त्यांचे समस्त मुठेवाडगाव ग्रामस्थ व श्रीरामपूर बस आगार तसेच श्रीरामपूरकरांच्यावतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.