शिवप्रहार न्युज - ०१ कोटी ३१ लाखाची फसवणूक ! अशोक बॅंकेत घडला प्रकार !!

शिवप्रहार न्युज -  ०१ कोटी ३१ लाखाची फसवणूक ! अशोक बॅंकेत घडला प्रकार !!

०१ कोटी ३१ लाखाची फसवणूक ! अशोक बॅंकेत घडला प्रकार !!

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) एका महिलेच्या खात्यातून ०१ कोटी ३१ लाख रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे . धक्कादायक बाब म्हणजे यात माजी आ.भानुदास मुरकुटे संचलित अशोक सहकारी बॅंकेच्या नगर मार्केट यार्ड शाखेचा शाखाधिकारी आरोपी असल्याचे फिर्यादित म्हटले आहे . 

        याप्रकरणी फसवणूक झालेल्या महीला सविता भानुदास कोतकर रा . शाहुनगर,लक्ष्मी निवास,केडगांव, अहिल्यानगर यांनी कोतवाली पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी मयुर वसंत शेटीया रा. केडगांव, संदिप वालचंद सुराणा रा. चास ,सी ए विजय मर्दा रा. नगर ,गणेश दतात्रय रासकर रा. नगर ,अभय निघोजकर,शाखा अधिकारी मार्केट यार्ड अशोक सहकारी बॅंक ,सागर कटारीया रा. केडगांव यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सविता भानुदास कोतकर यांचे अशोक सहकारी बॅंकेच्या मार्केट यार्ड शाखेत खाते आहे . आरोपीनीं संगनमत करून फसवणूकीचा कट रचला व फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्या स्वाक्षरी केलेल्या धनादेशाचा गैरवापर करून ०१ कोटी ३१ लाखाची रक्कम काढून घेतली.या प्रकरणी पोउनि योगिता कोकाटे या पुढील तपास करीत आहेत . या घटनेने खळबळ उडाली आहे.   

        माजी आ.भानुदास मुरकुटे हे स्वतः सी.ए. असून संस्था त्यांनीच चालवाव्यात असा सर्वसाधारण समज आहे.माञ सदरच्या अपहार प्रकरणाने हा समज फोल ठरला आहे.अशी अनेक प्रकरणे बँकेत घडत असल्याचे बोलले जात आहेत.बँकेतील सूञधार म्हणाविणा-या काही ठराविक व्यक्तींच्या हाती बँकेची सूञे गेली आहेत.हे सूञधार मोठमोठया जाहिराती देवून प्रसिध्दी मिळवितात.बँकेचे सर्वेसर्वा माजी आ.मुरकुटे हे याच ठराविक व्यक्तींच्या सुचनेनुसार कर्ज प्रकरणे मंजूर करतात अशी चर्चा आहे.तसेच कर्ज प्रकरणात कमिशानखोरी करतात.या सूञधारांनी कोट्यवधीची कमाई करुन वेगवेगळे उद्योग,व्यवसाय सुरु केल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे असे प्रकार घडून एकुणच अशोक बँकेच्या विश्वासहर्तेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.