शिवप्रहार न्यूज -साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी श्रीरामपूर तहसीलदारांची मातुलठाण येथील वाळू ठेकेदाराला नोटीस

शिवप्रहार न्यूज -साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी श्रीरामपूर तहसीलदारांची मातुलठाण येथील वाळू ठेकेदाराला नोटीस

साडे चार लाखाच्या बेकायदेशीर वाळु उपसा प्रकरणी श्रीरामपूर तहसीलदारांची मातुलठाण येथील वाळू ठेकेदाराला नोटीस ...

श्रीरामपूर -श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील वाळू लिलाव हा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे.या ठिकाणचा वाळू लिलाव श्री.गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे श्री अमित प्रेम मागो,रा-गंगापूर रोड,नाशिक यांनी घेतलेला आहे.याठिकाणी मंजूरक्षमते पेक्षा अधिक प्रमाणात बेसुमार वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.

      त्याची दखल घेत आज दिनांक 04 जून 2021 रोजी श्रीरामपूर तहसीलदार श्री.प्रशांत पाटील यांनी वाळू उत्खननाच्या प्राप्त तपासणी व मोजमाप अहवालावरून जवळपास चौदा ब्रास अतिरिक्त उत्खनन(एकुण 04,41,304 रुपये ची वाळु) झाले म्हणुन तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांनी मातुलठाण वाळू लिलाव ठेकेदार श्री गुरुकृपा लॉजिस्टिक तर्फे श्री अमित मागो यांना वाळू बेकायदेशीर उपसा केल्याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यान्वये कारवाई का करण्यात येऊ नये ? याबाबत कारणे दाखवा नोटीस दोन दिवसाच्या खुलासा मुदतीसह पाठवली आहे.

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सौ.अर्चना पानसरे यांनी काल गांधी पुतळा चौकात अवैध वाळू उपसा संदर्भात एक दिवसाचे उपोषण केले होते. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदारांची ही नोटीस निघाली आहे.