शिवप्रहार न्युज - धर्मांतरासाठी शाळेतील ख्रिश्चन पादरी जेम्सची विद्यार्थ्याला भावना दुखावून दमदाटी…

शिवप्रहार न्युज - धर्मांतरासाठी शाळेतील ख्रिश्चन पादरी जेम्सची विद्यार्थ्याला भावना दुखावून दमदाटी…

धर्मांतरासाठी शाळेतील ख्रिश्चन पादरी जेम्सची विद्यार्थ्याला भावना दुखावून दमदाटी…

राहुरी फॅक्टरी- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल मधील एका पादरी(फादर) तथा शाळेचा उपमुख्याध्यापक फादर जेम्स याने शीख धर्मीय विद्यार्थ्याला धर्मांतरासाठी दमदाटी केल्याची घटना घडली आहे.याबाबत 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने पोलिसात ख्रिश्चन पादरीच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल केला आहे.

      या विद्यार्थ्याने फिर्यादीमध्ये म्हटले आहे की,शाळेमध्ये असताना शाळेचा उपमुख्याध्यापक असलेल्या पादरी/फादर जेम्स याने तू तुझ्या नावात वारंवार सिंग सिंग का लावतो, तू पगडी का घालतो ,डोक्यावर घातलेली पगडी काढून केस काप आणि शीख धर्म बदलून ख्रिश्चन धर्मातील धर्मात ये नाहीतर धर्मांतरण कर असे पादरी बोलला. तसेच पादरी जेम्स असे देखील म्हणाला की,”तुला कॅन्सर झाला तर.तुझे डोक्यावरील केस कापावेच लागतील.त्यावर या स्वाभिमानी विद्यार्थ्याने कॅन्सर होऊन मी मेलो तरी चालेल पण माझा शीख धर्म सोडणार नाही आणि डोक्यावरील केस देखील कापणार नाही” असे बाणेदार उत्तर दिले.

         उपमुख्याध्यापक पदावरील या पादरीच्या कृतीमुळे शिक्षण क्षेत्राला मोठा काळीमा फासला गेला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांकडून चालू आहे.