शिवप्रहार न्यूज- 'नियम पाळा; विनाकारण बाहेर फिरल्यास पोलीस कारवाई करणार', गृहमंत्र्यांचा आक्रमक इशारा

शिवप्रहार न्यूज- 'नियम पाळा; विनाकारण बाहेर फिरल्यास पोलीस कारवाई करणार', गृहमंत्र्यांचा आक्रमक इशारा

मुंबई, 14 एप्रिल : राज्यातील कोरोनाची स्थिती (Maharashtra Corona Situation) अतिशय बिकट असून संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरू नका. अन्यथा, पोलीस कारवाई करतील, असा इशारा दिला आहे.

राज्यात आज रात्रीपासून 1 मेपर्यंत संचारबंदी (Maharashtra Lockdown) लागू होणार आहे. लोकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा अंतर्गत आणि इतर राज्यातूनही वाहतूक प्रवास करता येईल. मात्र, विनाकारण बाहेर पडल्यास पोलीस कारवाई करतील. वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या वेळेची टाळेबंदी आणि आत्ताचे संचारबंदी यामध्ये फरक आहे. मात्र लोकांनी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे आहे.