शिवप्रहार न्यूज श्रीरामपुरात अंडरग्राउंड पुलाखाली टँकर अडकल्याने चार चाकी वाल्यांचे हाल…
श्रीरामपुरात अंडरग्राउंड पुलाखाली टँकर अडकल्याने चार चाकी वाल्यांचे हाल…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अंडरग्राउंड पूल हा दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे.त्यामुळे नेवासा रोडवरील अंडरग्राउंड पुलाचा वापर वाहतुकीसाठी होत आहे.
परंतू आज गुरुवारी दुपारी नेवासा रोड अंडरग्राउंड पुलाखाली एक मळीचा टँकर नादुरुस्त झाल्याने अडकून पडला.त्यामुळे चार चाकी वाहनचालकाची मोठी तारांबळ झाली.शहरातील रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी थेट उड्डाणपुलाचा वापर चारचाकी वाहनचालकांना करावा लागला.
यावेळी तात्काळ पोलीस प्रशासनाच्या वतीने टँकर रस्त्यातून हटवण्याचे काम चालू झाले.