शिवप्रहार न्यूज- श्री छत्रपती शिवाजी चौकात का बसवला शिवप्रहार प्रतिष्ठान ने पुतळा.....

श्री छत्रपती शिवाजी चौकात का बसवला शिवप्रहार प्रतिष्ठान ने पुतळा.....

शिवप्रहार न्यूज- श्री छत्रपती शिवाजी चौकात का बसवला शिवप्रहार प्रतिष्ठान ने पुतळा.....
शिवप्रहार न्यूज- श्री छत्रपती शिवाजी चौकात का बसवला शिवप्रहार प्रतिष्ठान ने पुतळा.....

 श्रीरामपूर - गेल्या ४० वर्षापासून श्रीरामपूरातील शिवभक्तांची व हिंदू समाजाची मागणी आहे कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा, हिंदू समाजाचे हे ४० वर्षांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून शिवप्रहार प्रतिष्ठानने शिवजयंतीच्या दिवशी पहाटे छत्रपती शिवाजी  महाराजांचा  अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात बसवून हिंदूचे स्वप्न पूर्ण केले.

काही राजकारणी शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात यासाठी बसवत नाही कि त्यांची विशिष्ट वोटबँक  नाराज होईल 
आणि काही राजकारणी शिवाजी चौकात पुतळा बसवला तर आपल्याकडे राजकीय मुद्दा राहणार नाही म्हणून पुतळ्याचा प्रश्न जिवंत ठेवत आहे .या अश्या स्वार्थी आणि ढोंगी राजकारणाला वैतागुन शिवप्रहार प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी छत्रपतींचा पुतळा बसवला .
 
श्रीरामपुरात मदर तेरेसा च्या स्मारकाला जागा मिळते, महात्मा गांधी पूर्णाकृती पुतळ्याला जागा मिळते, राजकारण्यांच्या बापजाद्यांच्या पुतळ्याला जागा मिळते पण छत्रपतींच्या स्मारकाला जागा  परवानगी देत  नाही ,म्हणून शिवप्रहार ने शिवाजी चौकात पुतळा बसवला.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजातीय मावळ्यांना भगव्या ध्वजाखाली एकत्र करून या देशामध्ये हिंदू संस्कृतीचे पुंनरुज्जीवन केले .हिंदूचे मंदिरे व मंदिरातील मूर्ती  छत्रपती मुळे सुरक्षित राहिली , हिंदुच्या आया-बहिणींची अब्रू छत्रपतीनी राखली आज हिंदूची हिंदू म्हणून जी ओळख आहे ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे .
म्हणून छत्रपतींचा पुतळा शिवप्रहार प्रतिष्ठान ने श्री शिवाजी चौकात बसवला .
छत्रपतींनी जसे हिंदुच्या अस्मितेचे रक्षण केले तसेच शिवप्रहार प्रतिष्ठान जाती-पाती मध्ये विभागलेल्या हिंदू समाजाला भगव्या ध्वजाखाली एक करून हिंदुच्या भावना आणि अस्मितेचे रक्षण करत राहणार, गोरगरिबांच्या हक्काचे देखील रक्षण करीत राहणार. तसेच शिवछत्रपतींचे मूळ विचार हिंदू समाजासमोर आणण्याचे कार्य शिव प्रहार प्रतिष्ठान अविरत पणे करणार.
शिवप्रहार प्रतिष्ठान मध्ये समील होण्यासाठी संपर्क करा .
८३०८१३३०१३ ,८७८८९००३२० ,९७६२७१७५५२