शिवप्रहार न्युज - कोवीड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरला १० लाखाची खंडणी मागितली;ऑडिओ क्लिप व्हायरल
कोवीड हॉस्पिटल चालवणाऱ्या डॉक्टरला १० लाखाची खंडणी मागितली;ऑडिओ क्लिप व्हायरल (ऑडिओ क्लिप लिंक मध्ये जोडलेली आहे)…
पाथर्डी - पाथर्डी शहरातील कहॉस्पिटल चालवणारे डॉक्टर विनोद गर्जे यांच्याकडे आरोपी शैलेंद्र जायभाये, मिथुन डोंगरे ,नवनाथ उगलमुगले,मच्छिंद्र आठरे, सर्व राहणार- पाथर्डी या माहिती अधिकार कार्यकर्ते आरोपींनी माहिती अधिकार अर्ज संदर्भात मांडवली करण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी 14 जानेवारी ते 26 जानेवारी 2022 दरम्यान सलग मागितली तसेच एकूण चार लाख रुपयांची खंडणी आरोपींनी डॉक्टर गर्जे यांच्याकडून स्वीकारली.
त्यानुसार आरोपींविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपी क्रमांक दोन मिथुन डोंगरे याची डॉक्टर विनोद गर्जे यांच्यासोबत मोबाईलवर झालेली रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे.सदर रेकॉर्डिंग या बातमी सोबत जोडलेली आहे.