शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहर पोलिसांची हातभट्टीवर धडक कारवाई …

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर शहर पोलिसांची हातभट्टीवर धडक कारवाई …

श्रीरामपूर शहर पोलिसांची हातभट्टीवर धडक कारवाई …

श्रीरामपूर-आज दि. ०२/११/२०२२ रोजी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांनी मा. वरीष्ठांचे सुचनांनुसार श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करणे कामी विशेष पोलीस पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्यांचा शोध घेवून कारवाईचे आदेश दिले. 

      मिळालेल्या आदेशाप्रमाणे पोलीस पथक अवैध धंद्याचा शोध घेत असता, सायंकाळी वडारवाडा, गोंधवणीरोड,

श्रीरामपुर येथे आले असता, त्यांना माहिती मिळाली की, वडारवाडा परीसरात अवैध हातभट्टीची दारु बनत आहे. म्हणुन पोलीस पथकाने अचानक दोन ठिकाणी छापा टाकत, एकुण १,०५,०००/- रु. किंमतीची गावठी हातभट्टी मिळुन आली, सदरची गावठी हातभट्टीचे नमुने घेवुन सर्व दारुचा जागीच नाश करण्यात आला आहे. सदर बाबत आरोपी नामे राजेंद्र साहेबराव फुलारे, रा. वडारवाडा, गोंधवणी रोड, श्रीरामपुर याचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. १००६/ २०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा ६५ (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे तसेच आरोपी नामे अनिल मुकिंदा फलारे, रा. सदर याचे विरुद्ध गुन्हा रजि. नं. १००७/२०२२ महाराष्ट्र दारुबंदी कायदा ६५ (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले असुन पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस फौजदार, श्री. सुधीर हापसे हे पुढील तपास करीत आहेत. 

        सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, राकेश ओला, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, स्वाती भोर, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी, श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन यांनी रवाना केलेले पोलीस पथकातील सपोनि विठ्ठल पाटील, सहा. पोलीस फौजदार, सुधीर हापसे, पो.ना./ संजय पवार, पो.ना./ रघुवीर कारखेले, पो.कॉ./ प्रविण क्षिरसागर, पो.कॉ./ कैलास झिने व चालक.पो.कॉ./ बाळासाहेब गिरी यांनी केली आहे.