शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण व लव्ह जिहाद प्रकरणातील मावळ्यांचा सत्कार...
श्रीरामपुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण व लव्ह जिहाद प्रकरणातील मावळ्यांचा सत्कार...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये छत्रपतींचा पुतळा बसवण्यात यावा अशी गेल्या ४० वर्षापासुन हिंदू समाजाची भावना होती. या हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा काम अनेक राजकारण्यांनी केले आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घेतला.
त्यामुळे 31 मार्च 2021 रोजी शिवजयंतीच्या दिवशी पहाटे शिवप्रहार संघटनेच्या मावळ्यांनी छ.शिवाजी चौकात छत्रपतींचा आश्वारुढ पुतळा बसवला होता. त्याप्रकरणी शिवप्रहार संघटनेच्या मावळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये चंद्रशेखर आगे,प्रशांत भोसले,योगेश बोर्हाडे,सागर बाजारे, गणेश माळवे,बंटी बाजारे,उमेश शर्मा या मावळ्यांचा सहभाग होता.
तसेच एका हिंदू मुली बरोबर लव्ह जिहाद करण्याचा नगरच्या अतिक शेख याचा डाव देखील शिवप्रहार प्रतिष्ठान संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर आगे,प्रमोद कुर्हे प्रशांत आजगे,कार्तिक जेखवडे यांनी हाणून पाडला होता. त्यामुळे या हिंदू मुलीचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचले होते.
या दोन्ही घटनांमध्ये प्रमुख भूमिका निभावणारे शिवप्रहार च्या मावळ्यांचा शिवप्रहार प्रतिष्ठान संघटनेच्यावतीने लॅाकडाऊन उठल्यामुळे आज रोजी सत्कार करण्यात आला.