शिवप्रहार न्युज - मतदार संघातील दुष्काळजन्य भागात विकासाचा झेंडा रोवणार-राजाभाऊ कापसे...
मतदार संघातील दुष्काळजन्य भागात विकासाचा झेंडा रोवणार-राजाभाऊ कापसे...
श्रीरामपूर (प्रतिनिधी )
श्रीरामपूर मतदार संघातील नाऊर, नायगाव, रामपूर, चिंचोली, मातुलठाण हरेगाव, ऐनतपूर, आदी गावासह वाडी वस्तीवर अजूनही पिण्याच्या पाण्याची प्रचंड समस्या आहे. काही गावातील वाडी वस्तीवरील लोकांना रस्त्याच्या समश्यासह उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होत आहे.काही गावात शासनाचे लाखो रुपये खर्च होऊनही त्या पाण्याच्या टाकीत अजून पाणी न पोहचल्याने नागरिकांच्या दारात असलेल्या नळाला अजूनही पाणी आले नाही ज्या भागात पाण्याची टाकी आहे परंतु पाणी उपलब्ध होत नाही अश्या गावात त्या भागातील कालवा तलाव मार्फत पाणी साठा करण्यासाठी खास भर देणार असल्याचे मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी सांगितले.
मतदार संघातील नऊर नायगाव, मातुलठाण परिसरात प्रचार फेरी दरम्यान राजाभाऊ कापसे यांनी वाडी वस्तीवर जाऊन नागरिकांच्या समश्या जाणून घेत पाणी रस्ते या सुविधा पुरविण्यासाठी खास प्रयत्न करून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समश्या दूर करणार असल्याचे राजाभाऊ कापसे यांनी सांगितले.तसेच दुष्काळजन्य भागातील शाळा अजूनही धूळ व काटेरी झूडपात अडकलेल्या आहे वाडी वस्ती हुन शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर धूळ, खड्डे, काटेरी झूडपे असल्यामुळे शाळेत येणारी मुले त्रस्त होऊन आजाराचा सामना करीत आहे अश्या भागात तात्काळ रस्ते दुरुस्ती करून शाळेतील परिसर निसर्गरम्य करून धूळ व काटे मुक्त करून मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी सांगितले.