शिवप्रहार न्यूज- सोमवारचा बंद हा राजकीय पक्ष वा व्यक्तीचा नाही तर सकल हिंदू समाजाचा बंद आहे- शिवप्रहार प्रतिष्ठान...

शिवप्रहार न्यूज- सोमवारचा बंद हा राजकीय पक्ष वा व्यक्तीचा नाही तर सकल हिंदू समाजाचा बंद आहे- शिवप्रहार प्रतिष्ठान...

सोमवारचा बंद हा राजकीय पक्ष वा व्यक्तीचा नाही तर सकल हिंदू समाजाचा बंद आहे- शिवप्रहार प्रतिष्ठान...

 श्रीरामपूर- बेलापूर येथील एका चौदा वर्षीय हिंदू मुलीला आयुब शेख याने लव जिहाद करून दिनांक 22 जुलै 2021 रोजी पळून नेले आहे. तेव्हापासून या मुलीच्या परिवाराच्या पाठीशी कोणी उभे राहिले नव्हते.शिवप्रहार प्रतिष्ठानला दिनांक 2 ऑगस्ट 2021 रोजी या प्रकरणाची माहिती समजताच दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला शिवप्रहारच्या वतीने या हिंदू मुलीला शोधून त्या शेख विरोधात कारवाई होणे कामी निवेदन देण्यात आले होते.

      परंतु या निवेदनानंतर मुलगी मिळून न आल्याने गेल्या सोमवारी 9 ऑगस्ट 2021 रोजी शिवप्रहार प्रतिष्ठान,श्रीरामपूर व शहर आणि तालुक्याच्या सळसळत्या रक्ताच्या शेकडो हिंदू मावळ्यांचा श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्यात आला होता. 

          “शिवप्रहार” ने मोर्चा काढल्यानंतर अद्यापपर्यंत पोलिसांकडून या चौदा वर्षीय हिंदू मुलीचा शोध लागलेला नसल्यामुळे व आरोपी आयुब शेख याला देखील याच्यावर देखील कुठलीही कारवाई न झाल्यामुळे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील हिंदू मावळ्यांच्या वतीने शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवार दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी श्रीरामपूर शहर व बेलापूर गाव या ठिकाणी बंद पुकारण्यात आलेला आहे.

          कोरोनामुळे व्यापारी बांधव-व्यवसायिक हे संकटात आहे. याची आम्हाला कल्पना आहे परंतु हा विषय अतिशय गंभीर असा लव्ह जिहादचा असून एका चौदा वर्षीय गरीब हिंदू मुलीच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. सर्व व्यापारी बांधवांनी बेलापूर येथील एका प्रतिष्ठित व्यापारीसाठी तीन दिवस श्रीरामपूर शहर व बेलापूर गाव तीन दिवस बंद ठेवले होते.तसेच आपल्याला या गरीब हिंदू मुलीसाठी तिची लव्ह जिहादमधून सुटका होण्यासाठी श्रीरामपूर शहर व बेलापूरगाव बंद ठेवायचे आहे. जेणेकरून पोलीस यंत्रणा या मुलीचा तात्काळ शोध घेईल. 

            हा बंद कुठल्याही राजकीय पक्षाचा अथवा कुठल्याही राजकीय नेत्याचा नाही. तसेच कुठलाही राजकीय स्वार्थ मिळावा म्हणून हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा देखील हा प्रकार नाही. हा बंद श्रीरामपूर शहर व तालुक्यातील हिंदू समाजाच्या वतीने शिवप्रहार प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेला बंद आहे.यात कुठल्याही स्वरुपाचे राजकारण नाही याची दखल सर्व व्यापारी-व्यवसायिक बांधवांनी घ्यावी. 

          तसेच काही राजकारणी हे व्यापाऱ्यांना सोमवारी दुकाने चालू ठेवा,शिवप्रहारच्या हिंदु मुलीसाठी पुकारलेल्या बंदला समर्थन देऊ नका असे सांगून हिंदुविरोधी कृत्य करत आहे. तरी व्यापारी बांधवांनी अशा खोट्या प्रवृत्तीपासून सावध राहावे ही विनंती.