शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर यांना रमजान शहाकडून मारहाण...
श्रीरामपूर नगरपालिकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर यांना रमजान शहाकडून मारहाण...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणाऱ्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये जन्म-मृत्यू विभागात काम करणारे श्री.ज्ञानेश्वर चव्हाण यांना रमजान शहा,रा-वार्ड नं.02,श्रीरामपूर कडुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,आज मंगळवार दिनांक 20 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वा च्या सुमारास जन्म-मृत्यू विभागाचे कर्मचारी ज्ञानेश्वर चव्हाण हे जन्ममृत्यू विभागात कर्तव्य करत होते.तेव्हा त्याठिकाणी रमजान शहाने दाखल्यात बदल करताना स्पेलिंग का चुकले? असा आरोप करून ज्ञानेश्वर चव्हाण ला मारहाण केली. तसेच ज्ञानेश्वर ला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली.
यानंतर श्रीरामपूर नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेत काम बंद आंदोलन करू अशा प्रकारचे निवेदन श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष यांना दिले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालू असल्याची माहीती मिळत आहे.तसेच रमजान शहा हे माजी नगरसेविकेचे पती असल्याची माहिती मिळत आहे.